वाहतूकीस व रहदारीस अडथळा ; तीन वाहन चालकांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या रस्त्यावरिल पाठबंधारे कॉलनी समोर, कुवारबाव बाजारपेठ तसेच रामआळी येथील रस्त्यावर वाहतूकीस व रहदारीस अडथळा करणाऱ्या तीन चालकांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तानाजी कुंडलिक निमग्रे (वय ५६, रा. पाडावेवाडी, मिरजोळे हनुमाननगर, रत्नागिरी), लक्ष्मण शिवाप्पा धोत्रे (वय ३५, रा. क्रांतीनगर, मजगाव रोड, रत्नागिरी) व राज राजन नागले (वय २३, रा. आडीवरे बेणगीवाडी, रत्नागिरी) अशी संशयित चालकांची नावे आहेत. या घटना शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी पाच ते साडेसात च्या सुमारास पाठबंधारे कॉलनी, कुवारबाव बाजारपेठ, व रामआळी येथे निदर्शनास आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित चालकांनी वाहतूकीस व रहदारीस अडथळा होईल असे वाहन रस्त्यात पार्क केले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल महेंद्र खापरे, परि पोलिस उपनिरीक्षक रामचंद्र घाडगे, पोलिस हवालदार राहूल जाधव यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चालकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.