धामणसे येथील तरुणाची आत्महत्या
रत्नागिरी ः तालुक्यातील धामणसे चौकेवाडी येथील तरुणाने नायलॉनच्या साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. नितीन नारायण कळंबटे (वय २६, रा. धामणसे, चौकेवाडी, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २५) दुपारी अडीच ते पावणेतीनच्या सुमारास चौकेवाडी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार नितीन कळंबटे यांनी कोणत्यातरी अज्ञात कारणातून व आपल्या खोलीत जावून लाकडी वाशाला नायलॉनच्या साडीने गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.