कशेडीत घरात घुसून दाम्पत्यास मारहाण
खेड : तालुक्यातील कशेडी- सुतारवाडी येथे घरात घुसून दाम्पत्यास मारहाण करून महिलेस शिवीगाळ केल्याप्रकरणी १० जणांवर येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीमा सुरेश दरेकर यांनी येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.
चंद्रकांत नारायण दरेकर, उज्वला चंद्रकांत दरेकर, मनीष चंद्रकांत दरेकर, राजश्री राजेश दरेकर, रघुनाथ मोरे, उर्मिला रघुनाथ मोरे, विक्रांत चंद्रकांत दरेकर, प्राची विक्रांत दरेकर, तेजस मुकेश दरेकर, सुप्रिया प्रशांत पाटील अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादीचे पती घरगुती काम करत असताना संशयितांनी लाठ्याकाठ्या, लोखंडी पाईप घेऊन घरासमोर येत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.