उद्या 23 जुलै च्या मोर्च्यात युवा क्रांती सेना सहभागी होणार
रत्नागिरी : दिल्लीतील जंतरमंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या पोलीसी कारवाईच्या निषेधार्थ उद्या 23 जुलै रोजी रत्नागिरीत निघणा-या निषेध मोर्च्यात युवा क्रांती सेना हा पक्षही सहभागी होणार असल्याचे पक्षाचे संस्थापक अध्यक्ष जुनेद बंदरकर यांनी सांगितले.
शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचार मंच यांच्या वतीने या मोर्च्याचे आयोजन केले आहे, हा मोर्चा 23 जुलै रोजी सकाळी 11 वाजता रत्नागिरी येथील मारुती मंदिर सर्कल येथून मोर्च्याची सुरुवात होवून जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी येथे जाणार आहे.या मोर्च्यात रत्नागिरी येथील युवा क्रांती सेना पक्ष ही सहभागी होणार आहे,तरी सर्व नागरिक,युवक युवती यांनी या मोर्चात सहभागी होण्याचे आवाहन पक्षाचे संस्थापक अध्यक्ष जुनेद बंदरकर आणि कार्याध्यक्ष सचिन शिंदे यांनी केले आहे.