अपघात प्रकरणी कार चालका विरोधात गुन्हा दाखल
रत्नागिरी ः प्रतिनिधी
बेदरकारपणे कार चालवून रस्त्याच्या विरुध्द दिशेला जात समोरुन येणाऱ्या दुचाकी धडक देत अपघात केल्याप्रकरणी कार चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना 10 मे 2026 रोजी सायंकाळी 6 वा.सुमारास पावस ते रत्नागिरी रस्त्यावरील हॉटेल आनंदसमोर घडली होती.
अक्षय दत्ताराम वारीसे (31,रा.गोळप गोठणेवाडी,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताच नाव आहे. या अपघातात दुचाकी चालक तेजश्री अमित मोहिले (40),तिर्था चंद्रभूषण मुरकर (62)आणि माहिशा अमित मोहिले (6) या तिघांना दुखापत झाली होती. याप्रकरणी पोलिस हेड काँस्टेबल विरोधात प्रमोद कांबळे यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, 10 मे रोजी तेजश्री मोहिले आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एई-8568) वर तिर्था मुरकर आणि माहिला मोहिले यांना घेउन कुर्ली येथे जात होत्या. त्याच सुमारास अक्षय वारिसे हा आपल्या ताब्यातल स्विफ्ट डिझायर कार (एमएच-05-एफजे-3198) घेउन पावस ते रत्नागिरी असा येत होता. ही दोन्ही वाहने हॉटेल आनंद समोर आली असता अक्षयचा दुचाकीवरील ताबा सूटला आणि त्याने समोरुन येणाऱ्या दुचाकीला धडक देत हा अपघात केला होता. याप्रकरणी गुरुवार 4 जून रोजी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.