श्वसनाच्या त्रास जाणवू लागलेल्या तरुणाचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः श्वसनाचा त्रास जाणवू लागलेल्या तरुणाला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून मृत घोषित केले. आशिष जयराम कांबळे (वय ३८, रा. कापडगाव, बौद्धवाडी, रत्नागिरी) असे मृत तरुणाचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १५) रात्री दीडच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आशिष कांबळे यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने तात्काळ त्याला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय पाली येथे दाखल केले होते.अधिक उपचारासाठी रुग्णवाहिकेने जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. ग्रामीण पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.