वाहतूकीस अडथळा करणाऱ्या चालकाविरुद्ध गुन्हा
पावस ः पावस गाडी अड्डा येथील सार्वजनिक रस्त्यावर वाहतूकीस व रहदारीस अडथळा होईल असे वाहन पार्क करणाऱ्या चालकाविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शंकर भिमान्ना मदार (वय ३२, सध्या रा. मौलवी नदाफ यांच्या घीर भाड्याने, क्रांतीनगर, मजगाव रोड, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. १५) सायंकाळी साडेसातच्या सुमारास पावस गाडीअड्डा येथे निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित चालकाने सार्वजनिक रस्त्यावर वाहतूकीस व रहदारीस अडथळा होईल असे वाहन पार्क केले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल महेश कुबडे यांनी पुर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.