हायवेवर उभ्या ट्रकला दुचाकीची धडक
सातारा येथील ट्रक चालकावर गुन्हा दाखल
खेड:
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेड तालुक्यातील पगोडा हॉटेलसमोर उभ्या असलेल्या एका ट्रकला पाठीमागून दुचाकीने धडक दिल्याने अपघात घडला. या अपघातात दुचाकीस्वार तरुण जखमी झाला असून, रस्त्यात धोकादायक स्थितीत ट्रक उभा केल्याप्रकरणी ट्रक चालकावर खेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३१ मार्च रोजी सायंकाळी ८ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी अक्षय अरविंद आंग्रे (वय २७, रा. माणी, खेड) हे आपल्या पल्सर मोटारसायकलने (क्र. MH-08-BA-4983) चिपळूणहून माणी येथे जाण्यासाठी निघाले होते. ते मुंबई-गोवा हायवेवरील पगोडा हॉटेलसमोर आले असता, रस्त्यात आरोपी विक्रम मोहन चव्हाण (वय ३६, रा. कराड, जि. सातारा) याने आपल्या ताब्यातील महिंद्रा कंपनीचा ट्रक (क्र. MH-09-FL-9551) अतिशय धोकादायक स्थितीत उभा करून ठेवला होता.
ट्रक चालकाने सार्वजनिक रस्त्यावर वाहन उभे करताना सुरक्षेच्या दृष्टीने कोणतीही काळजी घेतली नव्हती. वाहनाचे पार्किंग इंडिकेटर किंवा इतर कोणतेही सिग्नल न लावल्यामुळे अंधारात उभ्या असलेल्या या ट्रकचा अंदाज फिर्यादी अक्षय आंग्रे यांना आला नाही. परिणामी, त्यांच्या दुचाकीची ट्रकच्या मागील उजव्या बाजूला जोरात धडक बसली. या अपघातात अक्षय आंग्रे यांना किरकोळ दुखापत झाली असून दुचाकीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
याप्रकरणी अक्षय आंग्रे यांनी दिलेल्या तक्रारीवरून खेड पोलिसांनी आरोपी ट्रक चालक विक्रम चव्हाण याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम २८५, १२५(अ) आणि मोटार वाहन कायद्याच्या