अफवाच पिक आणि पेट्रोल – डिझेलसाठी पंपावर रात्रभर रांगा
रत्नागिरी
आखाती देशांमधील युद्धामुळे इंधनाचे दर वाढण्याची किंवा इंधन संपण्याची अफवा पसरली आहे. त्यामुळे रत्नागिरीतील पेट्रोल पंपावर मंगळवारी रात्रीपासूनवाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पेट्रोल आणि डिझेलसाठी ही गर्दी बुधवारी दिवसभर कायम होती. सोशल मिडियावरील अफवांमुळे ही गर्दी झाल्याचे बोलले जात आहे.
मध्य पूर्वेत भयानक युद्धाला सुरुवात झाली आहे. इस्रायल आणि अमेरिकेकडून सातत्याने इराणवर हल्ला केला जात आहे. इराणनेही प्रत्युत्तर देत आखाती देशांमध्ये असणाऱ्या अमेरिकेन लष्करी तळांवर हल्ले केले आहेत. या युद्धामुळे जगभरातील कच्चा तेलाची पुरवठा साखळी खंडित झाली आहे. कारण अनेक तेलवाहू जहाजांवरही हल्ले केले जात आहेत. अशातच आता भारतासह जगभरातील देशांमध्ये कच्च्या तेलाची कमतरता निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे इंधनाचे दर वाढण्याची किंवा इंधन संपण्याची अफवा पसरली आहे. यासंबंधीचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यामुळे राज्यातील विविध शहरांमधील पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
आखाती देशात युद्ध सुरू झाल्याने रात्रीतून पेट्रोल बंद होणार असल्याची परभणीत अफवा पसरल्याने भीतीपोटी वाहनधारकांनी बाटल्या डब्बे घेऊन पेट्रोल पंपावर मोठी गर्दी केली आहे. गाडी फुल करून अनेकजण जमेल तसं पेट्रोल साठवून ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीजण म्हणत आहेत की, पेट्रोल बंद होणार आहे, तर कुणाला पेट्रोल 35 रुपयांनी महाग होणार असल्याची माहिती मिळाल्याने ही गर्दी झाली आहे. ही गर्दी बुधवारी सायंकाळ पर्यंत कायम होती. रत्नागिरी शहरातील सर्व पेट्रोल पंपावर सायंकाळ पर्यंत गर्दी होती. मात्र सायंकाळ नंतर गर्दी ओसरण्यास सुरुवात झाली.