रत्नागिरी दक्षिण भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीची घोषणा
जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांनी जाहीर केली नवी टीम
रत्नागिरी:
भारतीय जनता पार्टीच्या रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रशांत यादव यांनी आपल्या नूतन जिल्हा कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या निवडीला हिरवा कंदील दाखवल्यानंतर रत्नागिरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत यादव यांनी नवीन पदाधिकाऱ्यांची यादी प्रसिद्ध केली. पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी आणि आगामी काळातील निवडणुकांचे आव्हान पेलण्यासाठी अनुभवी आणि तरुण चेहऱ्यांचा समतोल या कार्यकारिणीत साधण्यात आला आहे.
या नवीन कार्यकारिणीमध्ये जिल्हाध्यक्ष म्हणून स्वतः प्रशांत यादव धुरा सांभाळणार आहेत. त्यांच्या सोबतीने उपाध्यक्ष म्हणून प्रमोद अधटराव यांच्यासह संदीप सुर्वे, संगीता जाधव, बळीराम मोरे, स्नेहा मेस्त्री, चंद्रकांत मांडवकर, भास्कर सुतार, विकास सावंत, सुहास आटलेकर आणि शितल पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
संघटनात्मक कामात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या सरचिटणीस पदाची जबाबदारी ओंकार फडके, स्वानंद रानडे, अभिजित गुरव आणि सुप्रिया उतेकर यांच्यावर सोपवण्यात आली आहे. चिटणीस म्हणून राजन पटवर्धन, निलेश भुरवणे, योगेश शिर्के, मनोज पाटणकर, नयना पवार, अनिल सावर्डेकर, समीर टाकळे, समिरा सुर्वे, अपेक्षा दाभोळकर आणि अभिनव भुरण यांची निवड झाली आहे. तसेच, जिल्ह्याच्या कोषाध्यक्षपदी मकरंद उर्फ आशिष खातू यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा विशेष निमंत्रित सदस्य म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे,मंत्री नितेश राणे यांच्यासह माजी आमदार विनय नातू, प्रमोद जठार, माजी युवा जिल्हाध्यक्ष अनिकेत पटवर्धन, दीपक पटवर्धन, विलास पाटणे यांच्यासह अन्य सदस्यांचा समावेश आहे
या पत्रकार परिषदेत बोलताना प्रशांत यादव यांनी विश्वास व्यक्त केला की, नवीन कार्यकारिणीतील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकजुटीने काम करून जिल्ह्यात पक्ष संघटना वाढवण्यासाठी अथक परिश्रम करतील. या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.