रत्नागिरीत वकिलांसाठी मध्यस्थी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू
रत्नागिरी : महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमानाने दि. १७ जानेवारी ते २१ जानेवारी २०२६ असे ४० तासाचा वकिलांसाठी मध्यस्थी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू झाला आहे. प्रशिक्षणाचे ठिकाण हॉटेल लँडमार्क, कॉन्फरन्स हॉल, रत्नागिरी हे ठेवण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्य प्रशिक्षक म्हणून मा. श्री. संजीव भालेराव, वरिष्ठ प्रशिक्षक, एम.सी.पी.सी. मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली तसेच मा. श्री. महेश जाधव, वरिष्ठ प्रशिक्षक, एम.सी.पी.सी. मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली यांची नेमणूक झाली आहे. या कार्यक्रमामुळे स्थानिक वकिलांना मध्यस्थी प्रशिक्षण मिळेल.