रत्नागिरी नगरपरिषदेत नगरसेवक आरक्षणात किरकोळ बदल
रत्नागिरी:
रत्नागिरी नगरपरिषदेच्या २०२५ मध्ये होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत बुधवारी मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या उपस्थितीत काढण्यात आली. संत गाडगेबाबा सभागृहात सकाळी ११ वाजता पार पडलेल्या या सोडतीमुळे १६ प्रभागांतील ३२ जागांसाठीचे राजकीय चित्र स्पष्ट झाले आहे. या आरक्षण सोडतीमध्ये प्रस्थापितांना दिलासा मिळाला असला तरी माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी यांचा पत्ता मात्र कट झाला आहे.
रत्नागिरी नगरपरिषदेतील एकूण १६ प्रभागांतून ३२ नगरसेवक निवडून जाणार आहेत. आरक्षण सोडतीनुसार, प्रत्येक प्रभागातील ‘अ’ आणि ‘ब’ गटासाठी बुधवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जातीचे आरक्षण कुठल्या प्रभागात पडणार याबाबत उत्सुकता होती. यावेळी प्रभाग क्रमांक 9 अ साठी हे आरक्षण पडले. तसेच प्रभागनिहाय आरक्षणामध्ये प्रभाग 1 अ सर्वसाधारण (स्त्री) आणि ब सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर झाले. प्रभाग 2 अ सर्वसाधारण (स्त्री) आणि ब सर्वसाधारण, प्रभाग 3 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री) आणि ब सर्वसाधार, प्रभाग 4 अ सर्वसाधारण (महिला) आणि ब सर्वसाधारण, प्रभाग 5 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) आणि ब सर्वसाधारण (महिला), प्रभाग 6 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) आणि ब सर्वसाधारण (महिला), प्रभाग 7 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) आणि ब सर्वसाधारण (महिला), प्रभाग 8 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री) आणि ब सर्वसाधारण, प्रभाग 9 अनुसूचित जाती (सर्वसाधारण) आणि ब सर्वसाधारण (महिला), प्रभाग 10 सर्वसाधारण (महिला) आणि सर्वसाधारण, प्रभाग 11 नागरिकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) आणि सर्वसाधारण (महिला), प्रभाग 12 नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री) आणि सर्वसाधारण, प्रभाग 13 सर्वसाधारण (महिला) आणि सर्वसाधारण प्रभाग 14 नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री) आणि सर्वसाधारण, प्रभाग 15 नागरिकांचा मागास प्रवर्ग (स्त्री) आणि सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक 16 मध्ये सर्वसाधारण (महिला) आणि सर्वसाधारण असे आरक्षण जाहीर झाले आहे.
हरकतींसाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत
ही आरक्षण सोडत गुरुवार, दिनांक ९ ऑक्टोबर २०२५ रोजी अधिकृतपणे प्रसिद्ध केली जाईल. यानंतर नागरिकांना या आरक्षणाबाबत आपल्या हरकती व सूचना दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत मुख्याधिकारी यांच्याकडे दाखल करता येणार आहेत. आरक्षण जाहीर झाल्यामुळे आता इच्छुकांमध्ये आणि राजकीय पक्षांमध्ये निवडणुकीच्या तयारीला वेग येणार आहे.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता हरकतींसाठी १४ ऑक्टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. नागरिकांना या आरक्षणाबाबत आपल्या हरकती व सूचना दिनांक १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३.०० वाजेपर्यंत मुख्याधिकारी यांच्याकडे दाखल करता येणार आहेत. आरक्षण जाहीर झाल्यामुळे आता इच्छुकांमध्ये आणि राजकीय पक्षांमध्ये निवडणुकीच्या तयारीला वेग येणार आहे.