व्यापारी अपहरणातील पाच संशयितांचा शोध
१२ जणांचा सहभाग; सूत्रधार रडारवर
देवरूख: देवरूख शहराला हादरवून सोडणाऱ्या सोने व्यापारी धनंजय केतकर अपहरण प्रकरणात एकूण १२ संशयितांचा सहभाग असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. या गुंतागुंतीच्या प्रकरणाचा तपास करताना देवरूख पोलिसांनी आतापर्यंत सात संशयितांना गजाआड करण्यात यश मिळवले आहे. मात्र, या गुन्ह्यातील पाच मुख्य संशयित अजूनही मोकाट असल्याने त्यांना पकडणे पोलिस यंत्रणेसाठी मोठे आव्हान ठरले आहे.
सुवर्णकार केतकर हे साखरप्याहून देवरूखच्या दिशेने येत असताना वांझोळे येथे त्यांचे अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्त्यांनी त्यांच्याकडील दागिने आणि रोख रक्कम लुटून
त्यांना काही अंतरावर असलेल्या वाटूळ येथे सोडून दिले होते. या घटनेनंतर केतकर यांनी देवरूख पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात फिर्याद दाखल क केली. आतापर्यंत पोलिसांनी सात .. जणांना अटक केली आहे.
या गुन्ह्याच्या मुळाशी जाताना एक महत्त्वाची बाब उघड झाली. संगमेश्वर तालुक्यातील कोंडगाव येथील दोन स्थानिक तरुणांनी मुंबईजवळील बदलापूर येथील तरुणांना हाताशी धरून व्यापारी केतकर यांचे अपहरण केल्याचे उघड झाले.
कटात सामील असलेल्या संशयितांची संख्या १२ असल्याचे निश्चित झाले आहे. यातील पाच संशयित अजूनही पसार आहेत. त्याचा पोलिसांकडून विविध पथकांद्वारे शोध सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.