
लांजात गावठी हातभट्टीची दारू बाळगल्याप्रकरणी एकास अटक
लांजा (रत्नागिरी): तालुक्यातील सालपे, बौध्दवाडी येथील पायवाटेवरील झाडी-झुडपात गावठी हातभट्टीची दारू गैरकायदा बिगरपरवाना विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगल्याप्रकरणी मंगेश संजीवन कांबळे (वय ३७, रा. सालपे, बौध्दवाडी) याला अटक करण्यात आली आहे.
ही घटना ११ जुलै रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. लांजा पोलीस ठाण्यातील मपोकाँ. प्रियांका अशोक कांबळे (८९) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपी मंगेश कांबळे याच्याकडून ५३५/- रुपये किमतीची ०५ लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली. त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.