
सावर्डे बाजारपेठेत आयशर टेम्पोची एस.टी. बसला धडक
एक प्रवासी किरकोळ जखमी
चिपळूण: चिपळूण एसटी डेपोचे चालक विजय बाबुराव राजेशिर्के यांच्या ताब्यातील एस.टी. बसला सावर्डे बाजारपेठ येथील एस.टी. बस स्टॉपवर एका आयशर टेम्पोने धडक दिली. ही घटना ११ जुलै रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास गोवा-मुंबई हायवे रोडवर घडली.
चिपळूण येथून दुर्गेवाडीकडे जाऊन परत येत असताना, प्रवासी घेण्याकरिता बस (क्र. MH20BL1867) थांबली होती. त्यावेळी प्रवासी मुलगी गाडीत चढत असताना सावर्डेकडून चिपळूणकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोने(क्र. MH08CP2838) अतिवेगात येऊन बसच्या पाठीमागील उजव्या बाजूला धडक दिली. या धडकेत एस.टी. बसचे नुकसान झाले असून, दिव्या दीपक घाणेकर (रा. कोडमळा, चिपळूण) ही प्रवासी मुलगी किरकोळ जखमी झाली. याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २८१, १२५ (अ) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार गुन्हा प्रवीण हरिश्चंद्र पाटील (रा. पिंपळवाडा, पेण, रायगड) या आरोपीविरुद्ध दाखल करण्यात आला आहे.