
राजापूर येथे राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या कार्यालयाचे उद्घाटन काँग्रेसच्या माजी विधान परिषदच्या आमदार सौ हुस्न बानू खलिपे यांचे हस्ते काण्यात आले
राजापूर :काँग्रेसची सत्ता घालवायला विद्यमान सत्ताधाऱ्यांना 70 वर्षे लागली. पण आपल्या सर्व काँग्रेस कार्यकर्त्यांना विद्यमान महायुती सरकार घालवायला फार काय वेळ लागणार नाही. त्यामुळे आतापासूनच गावागावात जाऊन काँग्रेस पक्षाच्या ग्राम कमिट्या तयार करा. जिल्हा परिषद व पंचायत समिती गट निहाय दौरे करून पक्ष बांधण्याची सुरुवात करा असे आवाहन काँग्रेसच्या नेत्या व माजी विधान परिषदेच्या आमदार ॲड. हुस्नबानू खलिफे यांनी राजापूर येथील कार्यक्रमात केले.
राजापूर तालुका काँग्रेस कमिटी च्या तालुका कार्यालयाचे उद्घाटन माजी विधान परिषदेच्या आमदार ॲड. हुस्नबानू खलिफे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमा वेळी नवनियुक्त तालुकाध्यक्ष जितेंद्र खामकर, लांजा तालुका अध्यक्ष राजू राणे, लांजाचे माजी तालुकाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद, राजापूर अर्बन बँकेच्या माजी अध्यक्ष अनामिका जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते व माजी जिल्हा परिषद सदस्य आबा आडीवरेकर, राजापूर माजी तालुकाध्यक्ष सुभाष बाकळकर, राजापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष सुरेश कोळेकर, श्रेष्ठ कार्यकर्ते व माजी नगरसेवक देवदत्त वालावलकर, माजी नगरसेविका मुमताज काजी, माजी नगराध्यक्ष स्नेहा कुवेसकर, माजी पंचायत समिती सदस्य बाजीराव विश्वासराव, राजापूर शहराध्यक्ष अजिम जैतापकर, महंमद अली वाघु, सौ. दिपा जितेंद्र खामकर, राधिका नलावडे, सौ. जान्हवी उदय धालवलकर, दिलीप फोडकर, मजीद सायेकर, मलिक गडकरी, डॉ. हसन शेख, आनंद भडेकर, किरण कोळेकर, सोनू तिरलोटकर, रघुनाथ आडीवरेकर, शैबाज खलिफे, मनेश कोंडकर, आतिफ मेमन, हनीफ कमरुद्दीन काझी आदींसह कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आपल्या मनोगतात जितेंद्र खामकर म्हणाले की राजापूर तालुक्यात अजूनही भाईसाहेब हातनकर यांना मानणारा मोठा वर्ग आहे. तालुक्यात अजूनही जुने जाणते कार्यकर्ते आहेत त्यांना काँग्रेस पक्षाबद्दल आत्मियता आहे. अशा सर्वांनाच जुन्या नवीन कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आपण सर्वांनीच एकत्रित मिळून काम करुयात असे प्रतिपादन केले.