
रत्नागिरी मधील अनेक होर्डिंग हटवली
आता राजीवडा येथील मच्छिमार्केट बाबतीत मनसे पहाणी करून नागरिकांसोबत चर्चा
रत्नागिरी : अधिकाऱ्यांच्या गैरकारभाराची वरात नगरपरिषद च्या दारात यां दणदणीत मोर्चा द्वारे मनसेने न प अधिकाऱ्यांच्या सोईच्या कारभारावर बोट ठेवून नूतन मुख्याधिकारीना याबाबत जाब विचारला होता. त्यावेळी दिलेल्या पत्रात मनसेने अनधिकृत होर्डिंग सह अनेक गोष्टीवर तिखट प्रश्न पुराव्या सह विचारले होते. त्यानंतर मुख्याधिकारी यांच्या भेटी मध्ये देखील मनसेने सर्व शहरातील अनेक गैरसोई पुराव्यासह मुख्याधिकारी यांना दाखवून दिल्या. मुख्याधिकाऱ्यांनी सोमवार पासून बदल होताना दिसू लागतील असे सांगितले होते. त्याप्रमाणे मोर्चाच्या दुसरा दिवसापासूनच शहरातील अनधिकृत होर्डिंग हटवायला सुरवात केली होती.
त्यानंतर राजीवडा येथील विषय देखील मनसे कडून हातात घेण्यात आला आहे.
मत्स्य विभागमार्फत राजीवडा जेटी येथे सुसज्ज अशी शेड बांधण्यात आली आहे तिथे मासे विक्री करणाऱ्या महिला न बसता शिवखोल घाटीच्या पायथ्यापासून च्या रस्त्यावर विक्री करिता बसतात. त्याचा त्रास तेथे राहणाऱ्या नागरिकांना होतं असल्या बाबतीत एक पत्र मनसेला प्राप्त झाले होते. त्या पत्राच्या अनुषंगाने राजीवडा येथील मच्छिमार्केट मधील आरक्षित भूखंड व रस्त्यावर होणाऱ्या मासे विक्री विषयी मनसे ने आज नगरपरिषद अधिकारी, मेरिटईम बोर्ड, मत्स्य विभाग, व स्थानीक नागरिक यांचे सोबत संयुक्त पाहणी केली. यां पाहणी दरम्यान असे दिसून आले की स्वतंत्र शेड बांधलेली असून तिथे मच्छि विक्री व्यवसाय न करता तेथील महिला रस्त्यावर बसून मच्छि विक्री करतात आणी त्या बांधून तयार असलेल्या शेड मध्ये मासेमारीचे साहित्य साठवून ठेवले आहे. ज्यामुळे संपूर्ण रस्ता अडून जातोय एखादा रुग्ण जरी घेऊन जायचा असेल तर त्या रस्त्यावरून जाणे अशक्य होईल. त्यासोबत व्यवसाय बंद करुन घरी जाताना जागा अडवणे करिता उरलेले मच्छि विक्रीचे साहित्य साठवण चे बॉक्स इत्यादी सामान तसेच रस्त्या कडेला लावून ठेवून जातात. याबाबत तेथील नागरिकांना तसेच मच्छि विक्री करणाऱ्या महिलांना समजावून ज्यांनी साहित्य ठेवून जागा अडवली आहे त्यांनी स्वतः ते साहित्य दोन दिवसात हलवून घ्यावे व रस्त्यावर बसणाऱ्या महिलांची सोय त्या शेड मध्ये करावी अशी विनंती मनसे च्या सचिन शिंदे अरविंद मालाडकर महेंद्र गुळेकर व बाबय भाटकर यांनी केली. तसेच शेड ची काही ठिकाणी दुरावस्था झाली आहे त्याची तात्काळ दुरुस्ती करावी लागेल असे मत्स्य विभाग मेरिटईम बोर्ड तसेच नगरपरिषद अधिकारी यांचे देखील निदर्शनास आणून देण्यात आले.
याबाबत शेडच्या बाजूला भराव करुन शेड च्या विस्ताराबाबतीत तसेंच अधिक काही मागणी असेल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेने तर्फे जिल्ह्याचे पालकमंत्री तसेंच संबंधित खात्याचे मंत्री यांचे कडे पाठपुरावा करून लवकरच घेऊ असे देखील आश्वास्त करण्यात आले. यावेळी मनसे तर्फे अरविंद मालाडकर सचिन शिंदे महेंद्र गुळेकर बाबय भाटकर महिला शहर सचिव संपदा राणा कार्यालय प्रमुख शैलेश मुकादम शहर सचिव गौरव चव्हाण नगरपरिषद मेरिटईम व मत्स्य खात्याचे अधिकारी व राजीवडा येथील अनेक नागरिक उपस्थित होते.