
बेशुद्ध अवस्थेतील अनोळखीचा आकस्मिक मृत्यू
रत्नागिरी ः कॉग्रेसभवन येथील एका हॉटेलसमोरील रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत आढळलेल्या अनोळखी प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार सुरु असताना तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले. ही घटना मंगळवारी (ता. १७) मध्यरात्रीच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अनोळखी हा कॉग्रेसभवन येथील दरबार हॉटेलच्या समोर बेशुद्ध अवस्थेत आढळला. अनोळखची वय अंदाजे ५५ आहे. (नाव पत्ता समजून येत नाही) पोलिसांनी व नागरिकांनी १०८ रुग्णवाहिकेला कळविले त्यांनी त्या प्रौढाला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.