राजापुरात महिलेचा आकस्मिक मृत्यू
राजापूर : तालुक्यातील एका महिलेचा श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला. २० एप्रिल रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास ही घटना घडली. महिलेला उपचारासाठी प्रथम राजापूर येथील सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. अधिक उपचारासाठी तिला ॲम्ब्युलन्सने सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे दाखल केले, परंतु तेथे उपचार सुरू असताना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मृत घोषित केले.
राजापूर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.