प्रेमसंबंधाच्या संशयावरुन मारहाण ; चार जणांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः शहराजवळील कुवारबाव पत्रकार कॉलनी येथील प्रौढाला प्रेमसंबधाच्या संशयावरुन मारहाण व लाकडी बॅटने मारुन दुखापत केली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्ता बिरा यमगर, आकाश बिरा यमगर, एक महिला, आकाश शामराव रुकनर अशी संशयितांची नावे आहेत. ही घटना मंगळवारी (ता. २२) रात्री साडेअकराच्या सुमारास पत्रकार कॉलनी- कुवारबाव येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी आनंद अकाराम घोडके (वय ४४) हे रात्री झोपलेले असताना संशयित दत्ता, अशोक, आकाश, व फिर्यादी यांची मुलगी स्नेहल आनंद घोडके हे त्यांच्या घरी आले. दत्ता यमगर याची पत्नी सौ. रुक्मीणी यमगर हिच्याशी आनंद घोडके यांचे प्रेमसंबध आहेत. असा संशयित घेवून दत्ता यमगर, आकाश रुनकर व स्नेहल घोडके यांनी फिर्यादी आनंद घोडके यांना शिवीगाळ करुन ठार मारण्याची धमकी दिली. तर संशयित अशोक यमगर याने फिर्यादी यांचे डोक्यात कपाळावर लाकडी बॅट मारुन दुखापत केली. या प्रकरणी आनंद घोडके यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.