गणेशगुळे किनाऱ्यावर १५०० कासवांचे संवर्धन
रत्नागिरी तालुक्यात चार किनारे
पावस: कासव संवर्धन केंद्र असलेल्या गणेशगुळे समुद्रकिनाऱ्यावरून यावर्षीच्या हंगामात आत्तापर्यंत १६०० घरट्यांमधून सुमारे १५०० ऑलिव्ह रिडले कासवाच्या जातीच्या पिल्लाने टप्प्याटप्प्याने समुद्राकडे झेप घेतली. तालुक्यात गणपतीपुळे, भाट्ये, गावखडी व गणेशगुळे किनारी ऑलिव्ह रिडले कासवं अंडी घालण्यासाठी येत आहेत.
गावखडी समुद्रकिनाऱ्यावर गेली अनेक वर्षे कासव संवर्धनाचा उपक्रम राबवला जात आहे. या समुद्रकिनाऱ्यावर यावर्षीच्या हंगामामध्ये १२९ घरटी मिळाली होती. त्यातील काही पिल्ले समुद्राकडे झेप घेत आहेत. त्या पाठोपाठ गणेशगुळे समुद्रकिनाऱ्यावरती यावर्षी २१ घरटे संरक्षित करण्यात आली होती. ही टप्प्याटप्याने घरटी तयार झाली होती. त्याचे संवर्धन कासवमित्र सचिन तोडणकर यांनी केली. या केंद्रामध्ये त्यांनी लक्ष देऊन ही घरटी चांगल्या त-हेने संरक्षित केली आणि ती पिल्ले तयार झाल्यानंतर टप्याटप्प्याने समुद्राकडे सोडण्यात येत आहेत. आतापर्यंत टप्प्याटप्प्याने १६ घरट्यातील सुमारे १५०० ते १६०० पिल्ले समुद्राकडे झेपावली आहेत. त्यामुळे उर्वरित घरटी टप्प्याटप्प्याने तयार होत असून, येत्या १५ ते २० दिवसांमध्ये ही घरटी तयार होऊन पिल्लांच्या माध्यमातून समुद्राकडे झेप घेतील.