एसटी-दुचाकीचा अपघात ; एसटी चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः शहरातील चर्मालय येथील चार रस्त्यावर एसटी बसने दुचाकीला धडक दिली. या अपघात प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात एसटी बस चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जैनुद्दीन महमदसाहब शेख (वय ४२) असे संशयित बस चालकाचे नाव आहे. ही घटना ११ मार्च २०२५ सकाळी साडेआठच्या सुमारास चर्मालय येथील चार रस्ता नाक्यावर मजगाव ते मारुती मंदिर जाणाऱ्या रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार दुचाकी स्वार राहुल सुरेश तेरवणकर (वय ३६) हे दुचाकी (क्र. एमएच-०८ एसी ५६५८) घेऊन सकाळी आठच्या सुमारास परटवणे ते साळवी स्टॉप असे जात होते. त्यावेळी एसटी बस चालक गाडी (क्र एमएच १४ बीटी ४४६१) ही मजगाव दिशेने घेऊन जात असताना बस निष्काळजीपणे चालवून दुचाकीला ठोकर दिली. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल उमेश पवार यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित एसटी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.