
चिपळूण जुना एस. टी. बस स्थानकावर आढळला मृतदेह
चिपळूण : चिपळूण जुना एस. टी. बस स्थानकावर रविवार दि. 2 मार्च रोजी सायंकाळी 6 वाजता एका अनोळखी पुरुषाचा मृतदेह आढळला असून त्याची ओळख अद्याप पटलेली नाही.
या बाबत वास्ता उमेश काटकर यांनी खबर दिली की जुना एस. टी.स्टॅन्डमध्ये एक माणूस पडलेला आहे. पोलिसांनी खात्री केली असता तो मयत होता. परन्तु अनोळखी आहे. या प्रकरणी चिपळूण पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सादर पुरुषाचे पार्थिव कामथे हॉस्पिटलमध्ये ठेवण्यात आले आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलीस भूषण सावंत व पोलीस कॉन्स्टेबल श्री. कदम करीत आहेत. या बाबत कोणाला काही माहिती असेल तर चिपळूण पोलीस ठाण्यात संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.