
श्रवण क्षमतेची सर्वांनी काळजी घ्यायला हवी – जागतिक श्रवणदिनी : डॉ.कश्मीरा चव्हाण यांचे प्रतिपादन
अली यावर जंग राष्ट्रीय वाक व श्रवण दिव्यांगजन संस्था मुंबई,
रत्नागिरी : जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने, स्वर्गीय श्री. शामरावजी पेजे सभागृह जिल्हा परिषद रत्नागिरी येथे जागतिक श्रवण दिनानिमित्त दिव्यांग दिव्यांग व्यक्ती साठी सरकारी धोरणे योजना आणि करिअर मार्गदर्शन जनजागृती कार्यक्रमांमध्ये डॉक्टर एल.एच.हिरानंदानी हॉस्पिटल पवई मुंबईच्या, कान नाक घसा तज्ञ डॉ. कश्मीरा चव्हाण यांनी श्रवणदोष प्रतिबंध, व चांगले ऐकायला येण्यासाठी कानाची घ्यायची काळजी याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमांचे प्रमुख पाहुणे जिल्हा समाज कल्याण अधिकारी श्री.जयेंद्र जाधव हे होते. या कार्यशाळेत, अपंगत्व असलेल्या मुलांसह जुळवून घेणाऱ्या कुटुंबासमोरील समस्या व वास्तव या विषयावर श्री. सचिन सारोळकर यांनी मार्गदर्शन केले.तर श्रवण दोष लवकर निदान व लवकर उपचार या विषयावर वाचा उपचार तज्ञ प्राजक्ता भोगटे-सातवसे यांनी प्रकाश टाकला. दिव्यांग व्यक्तींसाठी कल्याणकारी योजना रोजगार आणि स्वयंरोजगार संधी या विषयावर अली यावर जंग राष्ट्रीय वाक व श्रवण दिव्यांग जनसंस्था मुंबई चे व्यवसाय सल्लागार श्री. नवनाथ जगदाळे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
श्री संकेत चाळके यांनी जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्रामार्फत देण्यात येणाऱ्या सेवांची माहिती दिली. AVT थेरपीस्ट वहिश्ताई दाबू यांनी देखील श्रवण व वाचा उपचार याचे महत्व विषद केले.
या कार्यशाळेचे सूत्रसंचालन जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राच्या संचालक सुरेखा पाथरे यांनी केले,कर्णबधिर दिव्यांगांसाठी दुभाषक म्हणून श्री. अरुण फाटक यांनी काम पहिले तर आभार प्रदर्शन आस्था च्या संपदा कांबळे यांनी केले. कार्यशाळेला मोठ्या संख्येने दिव्यांग त्यांचे पालक दिव्यांग क्षेत्रात काम करणारे कार्यकर्ते उपस्थित होते.