
विजय वडेट्टीवारांचा राज्यभर निषेध, माफीची मागणी
संप्रदायतफे ठिकठिकाणी जिल्हाधिका-यांना निवेदन
रत्नागिरी, : कॉग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा एकेरी उल्लेख करून त्यांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ आज त्यांच्या भक्त परिवारातर्फे राज्यभर निषेध करण्यात आला. अनेक ठिकांणी जिल्हाधिका-यांना निवेदने देण्यात आली. त्याचबरोबर संप्रदायातर्फे रत्नागिरीतही आज एकत्रित निषेध नोंदवनॅट आला. यावेळी तीव्र संताप व्यक्त केला. राज्यात ठिकठिकाणी वडेट्टीवारांचा निषेध करणे, त्यांच्या प्रतिमेला काळे फासणे, जोडे मारणे, प्रतिकात्मक अंतयात्राही काढणे, असे सर्वत्र सुरू होते.
यापूर्वी युती सरकारला जे मोठे यश मिळाले ते सांधू-संतांमुळे मिळाले, असे उद्गार जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांनी नाणीजक्षेत्र संतशिरोमणी गजानन महाराज यांच्या उत्सवावेळी झालेल्या पत्रकार परिषदेत काढले होते. सांधू-संतांनी राज्यातील हिंदूमध्ये जागृती केली. हिंदू धर्मावरील अन्याय टाळण्यासाठी हिदूत्ववादी विराचाराचे सरकार आले पाहिजे, अशी भूमिका घेऊन त्यांची प्रचार केला होता. त्यामुळे युती सरकारला चांगले बहुमत मिळाले. यावर खरे तर राजकीय मंडळींनी मतप्रदर्शन करण्याची गरज नव्हती. युतीच्या विजयात साधू-संतांचाही वाटा आहे. हे विद्यमान सरकारही मान्य करेल. असे असताना विजय वडेट्टीवार यांनी उगीचच या विषयात तोंड खूपसून जगद्गुरूश्रींचा एकेरी उल्लेक खरत अवमान केला.
त्यांच्या निषेधार्थ गेले दोन दिवस भक्तांनी राज्यभर तीव्र संताप व्यक्त करीत निषेध नोंदवला. काल नागपूर, भंडारा येथे आंदोलन केले. आज सर्व राज्यभर त्यांचे भक्त संताप व्यक्त करीत आहेत. वडेट्टीवार यांनी कसलाही अभ्यास न करता केवळ प्रसिद्धीसाठी असे विधान केले आहे. त्याबाबत त्यांनी महाराजांची जाहीर माफी मागावी, अशी त्यांची मागणी आहे. तसे न केल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा सर्व भक्तांनी दिला आहे.
जगद्गुरूंचे राज्यभर विधायक कार्य मोठे आहे. नुकतेच त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या रुग्णालयांना १,३६,२७० रक्तकुपिका दिल्या. त्यांच्या प्रेरणेतून राज्यभरातील वैद्यकीय महाविद्यालायांना ८३ मरणोत्तर देहदान करण्यात आले आहेत. संस्थानच्या ५३ रुग्णवाहिका २४ तास अपघातग्रस्तांच्या सेवेत आहेत. त्यामुळे हजारो जखमींचे प्राण वाचले आहेत. इतर अनेक सेवाभावी कामे संस्थानतर्फे वर्षभर सुरू असतात. त्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही असे भक्तांचे म्हणणे आहे. वडेवट्टीवारांनी माफी मागेपर्यंत आमचा शांततेच्या मार्गाने लढा चालूच राहील, असा इशारा भक्तांनी दिला आहे. त्यामध्ये महिलांची संख्या प्रचंड आहे. त्यांनी जोडे मारणे, काळे फासणे, तीव्र निषेध करणे यात सहभाग घेतला आहे.
फोटो ओळी-
रत्नागिरी येथे सोमवारी विजय वडेट्टीवार यांचा निषेध व्यक्त करताना जगद्गुरू नरेंद्राचार्यजी महाराज यांचे भक्त.