
उदक शांत नाटकाच्या प्रयोगाने परचुरीवासीय झाले भावूक
संगमेश्वर:- तालुक्यातील परचुरी येथे नुकताच उदक शांत या नाटकाचा प्रयोग करण्यात आला. गावातील श्री भैरी भवानी मंडळ परचुरी चंदरकर वाडी या मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त या नाटकाचा प्रयोग करण्यात आला.
हे नाटक कौटुंबिक जिव्हाळ्याचे हृदयस्पर्शी असे नाटक होते.नाटकातील सर्व कलाकारांनी एक एक पात्र अगदी जिवंत केले. हे नाटक बघताना अनेकांच्या डोळ्यांत अश्रू देखील आले.
उदक शांत हे नाटक समीर मोने यांनी लिहिले आहे. य या नाटकाचे निर्माता म्हणून जयराम घाणेकर,अनिल चंदरकर,गणपत चंदरकर यांनी काम पाहिले तर या संपूर्ण नाटकाचे दिग्दर्शन सुनील चंदरकर यांनी केले. या नाटकाला संगीत योगेश मांडवकर आणि राजेश दुदम यांनी दिले असून तबला साथ तुषार चंदरकर यांनी दिली.या नाटकाची प्रकाशयोजना संतोष नार्वेकर आणि सुनील दत्त यांनी केली तर या नाटकाला सल्लागार म्हणून संतोष चंदरकर, सुरेश चंदरकर, विजय दुदम यांची मोलाची साथ मिळाली.या नाटकाचे नेपथ्य दिलीप धामणे यांनी केले. ध्वनीसंकलन श्री भैरीभवानी मंडळ विजय चंदरकर यांनी केले. या नाटकामध्ये कलाकार म्हणून रोशन दुदम,संदेश दुदम,सिद्धार्थ चंदरकर, निकिता घाग,रंजना म्हाब्दी,सुमित दुदम आणि हौशी कलाकार म्हणून प्रमोद चंदरकर यांनी काम केले.
मंडळाचा रौप्य महोत्सवी कार्यक्रम उत्साहात संपन्न
श्री भैरी भवानी मंडळ परचुरी चंदरकर वाडी या मंडळाच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रम मंडळाच्यावतीने धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. सन २००० रोजी या मंडळाची स्थापना झाली. तेव्हा सुरुवातीला वगनाट्य करण्यात आले होते. नंतर हळू हळू मंडळाने भरारी घेतली. आज हे मंडळ मोठ मोठी नाटके मंचावर सादर करत असते. अनेक स्पर्धामध्ये सहभागी होऊन या मंडळाने विविध पारितोषिके जिंकली आहेत.
कार्यक्रमावेळी मंडळाच्यावतीने ग्रामस्थ,पदाधिकारी तसेच कार्यक्रमासाठी आलेले प्रमुख पाहुणे यांना विठ्ठल रखुमाईची मूर्ती आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष दीपक लिंगायत,परचुरी गावच्या सरपंच शर्वरीताई वेल्ये, उपसरपंच प्रदीप चंदरकर,माजी उपसभापती पंचायत समिती परशुराम वेल्ये, तंटामुक्ती अध्यक्ष अनंत शिंदे,पोलिस पाटील सुधीर लिंगायत,ग्रामपंचायत सदस्य,पत्रकार मुझम्मील काझी,सामाजिक कार्यकर्ते वहिद राजापकर, उक्षी गावचे माजी उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे, सामाजिक कार्यकर्ते वसंत मेस्त्री, मंडळाचे संजय चंदरकर,डॉ.विनायक पेठे, डॉ.चंद्रकांत लिंगायत, गीतकार मधुकर यादव,शाहीर प्रकाश पंजने,उदय चिबडे,सदाशिव धांगडे, संदेश दुदम व तसेच मंडळाचे सर्व पदाधिकारी, ग्रामस्थ, माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.