
श्वसनाच्या त्रासाने प्रौढाचा मृत्यू
रत्नागिरी : तालुक्यातील कोळंबे-वाकीवाडी येथील श्वसनाचा त्रास जाणवू लागलेल्या प्रौढाला अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले. हरिश्चंद्र महादेव भितळे (वय ५४, रा. कोळंबे वाकीवाडी, रत्नागिरी) असे मृत प्रौढाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २३) दुपारी एकच्या सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार हरिश्चंद्र भितळे यांना एक महिन्यापूर्वी काविळ आजार झाला होता. त्यांच्यावर आयुर्वेदिक उपचार सुरु होते. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने खासगी दवाखान्यात नेऊन अधिक उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.