
फसवणूक प्रकरणाचा सखोल तपास सुरू
खेड : खेड तालुक्यातील चिंचघर-प्रभूवाडी येथील एकाची १६ लाख ४१ हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याप्रकरणी येथील पोलिसांनी गजाआड केलेल्या राजेशभाई मंगेशभाई अहिरे (३३, रा. सुरत- गुजरात) याच्याकडून पोलिसांना विसंगत उत्तरे मिळत आहेत. त्यामुळे फसवणुकीतील रकमेचा अद्याप काहीच सुगावा लागलेला नाही. पोलिस निरीक्षक नितीन भोयर यांच्याकडून सखोल तपास सुरू आहे. कंपनीत गुंतवणूक केल्यास जादा रकमेचा परतावा देण्याचे आमिष दाखवत सचिन सदानंद सावंत (चिंचघर-प्रभूवाडी) यांना भामट्याने हा गंडा घातला होता. त्यांच्या मोबाईलवर ट्रेडिंग कंपनीत रक्कम गुंतवण्याबाबत एसएमएस पाठवून रक्कम उकळली होती.