
ठाकरे सेनेतून तिघांची हकालपट्टी; दत्ता कदम शिवसेनेचे प्रभारी जिल्हाप्रमुख
रत्नागिरी
उद्धव ठाकरेंच्या आदेशाने रत्नागिरीतील ३ बड्या पदाधिकाऱ्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचं पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. विलास चाळके यांच्या हकालपट्टी नंतर शिवसेना ( उबाठा ) गटाच्या दक्षिण जिल्हाध्यक्ष पदावर प्रभारी म्हणून शिवसैनिक दत्ता कदम यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिवसेना सचिव माजी खासदार विनायक राऊत यांच्या सहीने हे पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. या पत्रात म्हटलंय की, रत्नागिरी जिल्हा सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, जिल्हाप्रमुख विलास चाळके, चिपळूण संगमेश्वर विधानसभा प्रमुख रोहन बने यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. ही माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकातून कळवण्यात आले आहे.