
२५ लाखांचा गंडा घालणाऱ्या न्यायालयीन कोठडीत
खेड: शहरातील एका तरुणास २४ लाख ८५ हजार रुपयांचा ऑनलाईन गंडा घालणाऱ्या नारायणलाल शंकरलाल जोशी (४२, रा. सुरत-गुजरात) या भामट्यास न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.
फसवणूक प्रकरणाचे नेमके कनेक्शन उघडकीस आणण्याच्या दृष्टीने पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्याकडून सखोल तपास सुरू आहे. कंपनीत गुंतवणूक केल्यास जादा परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत येथील एका तरुणाची २४ लाख ८५ हजारोंची फसवणूक केल्याप्रकरणी येथील पोलिसांनी यापूर्वी नीरज महेंद्र नांगरा (२२, चंढीगड-हरियाणा) याला चंढीगड येथून जेरबंद केले होते.