
संगमेश्वर फुणगुस येथे कंटेनर पलटी, सुदैवाने चालक, क्लिनर बचावले
संगमेश्वर :तालुक्यातील फुणगुस येथे अवघड वळणावर कंटेनर पलटी झाल्याची घटना मंगळवार 27 ऑगस्ट रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने यामध्ये चालक व क्लिनर बचावला.
सविस्तर वृत्त असे की, रत्नागिरी कोतवडे येथून मुंबईच्या दिशेने कंटेनर चालक चालला होता. कंटेनरमध्ये 800 किलो चींगले भरलेली होती. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास चालक संगमेश्वरच्या दिशेने फुणगुस मार्गे जात असताना एका अवघड वळणावर त्याचा गाडीवरील ताबा सुटला. यावेळी कंटेनर उजव्या बाजूला जाऊन पलटी झाला. कंटेनर पलटी होतोय कळताच चालकाने कलिनरच्या बाजूने दोघांनीही बाहेर उडी घेतली. यामुळे दोघेही बचावले. यामध्ये चालक, क्लिनरला किरकोळ जखमा झाल्या. अपघातानंतर ग्रामस्थांनी बचाव कार्यासाठी धाव घेतली. त्यानंतर जवळपास दोन तासाच्या प्रयत्नानंतर क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला करण्यात यश आले.