
संगमेश्वर सोनगिरी येथील ग्रामस्थांनी गावात वृक्षारोपण करुन जपली सामाजिक बांधिलकी*
संगमेश्वर
दिनांक 28 जून रोजी सोनगिरी गावात भव्य असा वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला गावातील असंख्य गावातील लोकांनी सहभाग नोंदवला, विशेष म्हणजे सोनगिरी गावातील हिंदू मुस्लिम ग्रामस्थ एकत्र येऊन हा कार्यक्रम पार पडला त्यात हिंदू मुस्लिम एकतेचे प्रतीक या निमित्ताने गावात दिसून आले, तसेच गावातील महिला सुद्धा या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
वृक्षारोपण करताना वड, पिंपळ, जांभूळ, रायवळ आंबा, आवळा, चिंच अशी पर्यावरण पूरक झाडांची लागवड करण्यात आली, खातू गुरुजी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करताना उपस्थित नागरिकांना वृक्षारोपण करण्याचे महत्व आणि फायदे सुंदर पद्धतीने त्यांच्या खास शैलीत पटवून सांगितले. वृक्षारोपण करण्यासाठी लागणारी झाडे कोळंबे सोनगिरी ग्रामपंचायत कडून देण्यात आली, तसेच अनेक मुंबईकरांनी यासाठी आर्थिक मदत केली.
या कार्यक्रमासाठी खास मुंबईवरून शाहीर नितीन रसाळ तसेच कोळंबे सोनगिरी ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक मीनाक्षी गुरव, सोनगिरी गावचे पोलीस पाटील विनेश टाकळे, माजी सरपंच इम्तियाज कापडे, गोविंद पंडित, दत्ताराम पंडित, ग्रामपंचायत माजी सदस्य सुलतान हफसानी, सुगंधा टाकळे, अक्षया रसाळ , सोनगिरी कोंडाचे गावचे मानकरी विश्वास टाकळे, मोहल्ला कमिटीचे उपाध्यक्ष गौसुद्दीन कापडे, कासम मयेर, यासिन सनगे, महिला बचत गटाच्या CRP विशाखा टाकळे, विलास पंडित, रमेश पंडित,संकेत पंडित, सचिन खातू, दिनेश खातू आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाहिर नितीन रसाळ, दत्तात्रय खातू ( खातू गुरुजी )पोलीस पाटील विनेश टाकळे, आणि गावातील ग्रामस्थ पुरुष महिला यांनी मेहनत घेतली. तसेच लावलेल्या झाडांचे संगोपन करण्याचे आश्वासन दिले.