
संगमेश्वर स्मशान शेडमध्ये तरुणाचा मृत्यू
संगमेश्वर : संगमेश्वर-कोल्हापूर राज्य मार्गावरील संगमेश्वर स्मशानशेड येथे तरुणाचा मृत्यू झाला. अतिव्यसन केल्याने मृत्यू झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मनोज प्रल्हाद भरणकर असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.
या बाबत विनोद प्रल्हाद भरणकर यांनी संगमेश्वर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. मनोज प्रल्हाद भरणकर (४०, रा. नावडी संगमेश्वर) यांना दारुचे अतिव्यसन होते. २७ जूनला मनोज हे अति दारु पिवून दारुच्या नशेत पडून मृत झाले. अधिक तपास संगमेश्वर पोलीस ठाणेचे पी. एस. शिंदे हे करीत आहेत.