खेडमधून रेल्वेला दरमहा लाखो रुपयांचा महसूल
रेल्वेस्थानक ठरतेय कोकण रेल्वेसाठी उत्पन्नाचा स्रोत
खेड : कोकण रेल्वे मार्गावरील येथील रेल्वेस्थानक हे केवळ प्रवाशांच्या दृष्टीनेच नव्हे तर कोकण रेल्वे व प्रशासनाच्या महत्त्वाच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचे स्थानक ठरले आहे. तालुक्यासह लोटे परशुराम औद्योगिक वसाहत आणि आसपासच्या परिसरातील प्रवाशांच्या वाढत्या गर्दीमुळे या स्थानकातून रेल्वे प्रशासनाला दरमहा सरासरी ८० ना लाख ते १ कोटी २५ लाखांहून अधिक उत्पन्न प्राप्त होत असल्याची माहिती समोर आली आहे.
येथील रेल्वेस्थानकात दररोज २० ते २५ प्रवासी गाड्यांच्या फेऱ्या होतात. या सर्वच गाड्यांना येथील स्थानकात अधिकृत थांबा देण्यात आला आहे. कोकणकन्या, मत्स्यगंधा, जनशताब्दी, तुतारी एक्स्प्रेस, सावंतवाडी-दिवा पॅसेंजर या गाड्यांचा समावेश आहे. गणेशोत्सव, दिवाळी, शिमगोत्सव आणि सुट्ट्यांच्या काळात या मार्गावरुन दररोज १० ते १५ अतिरिक्त विशेष गाड्या धावतात. यामुळेही मोठा फायदा स्थानिक प्रवाशांना होतो.
आरक्षित आणि अनारक्षित तिकिट विक्रीतून दरमहा ८० लाख ते १ कोटी २५ लाख तर हंगामाच्या काळात कोकणवासियांच्या तुफान गर्दीमुळे हाच आकडा दरमहा १ कोटी ५० लाख ते. २ कोटीपर्यंत पोहोचतो. पार्सल सेवा आणि लोटे एमआयडीसीशी संबंधित व्यापारी मालवाहतुकीतूनही अतिरिक्त उत्पन्न प्राप्त होते. वाढत्या उत्पन्नाच्या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे प्रशासनाकडून येथील स्थानकावर विविध सुविधांचा विस्तारही केला जात आहे.
लोटे एमआयडीसीतील औद्योगिक माल, स्थानिक आंबा, काजू आणि कृषी उत्पादनाच्या सोयीस्कर वाहतुकीसाठी स्थानकावर नवीन गोदाम आणि कंटेनर सायडींग सुविधा उभारली जात आहे. शेतमाल व नाशवंत वस्तूंच्या सुरक्षित साठवणुकीसाठी कोल्ड स्टोरेज प्रकल्प प्रस्तावित आहेत, अत्याधुनिक