वाहतूकीस अडथळा करणाऱ्या दोन चालकांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः शहराजवळील कारवांचीवाडी फाटा ते गयाळवाडी रस्त्यावर वाहातूकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दोन वाहन चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आली आहे. प्रशांत मोहन घाणेकर (वय ३४, रा. खेडशी डफलवाडी, रत्नागिरी) व सुभाष चंद्रकांत खेत्री (वय ३७, खेडशी, रत्नागिरी) अशी संशयित चालकांची नावे आहेत. या घटना मंगळवारी (ता. ३) दुपारी साडेबार ते एकच्या सुमारास निदर्शनास आल्या पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित वाहन चालकांनी वाहतूकीस व इतर वाहनांस अडथळा, धोका निर्माण होईल अशी लावून ठेवली. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल स्वप्नील तेरवणकर यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.