रत्नागिरी तालुक्यात ५७७ वनराई बंधारे पूर्ण
लोकसहभागातून जलसंधारणाला बळ; ६०० बंधाऱ्यांचे उद्दिष्ट
रत्नागिरी: उद्भवणाऱ्या गंभीर पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी रत्नागिरी तालुक्यात ‘वनराई बंधाऱ्यां’ची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. लोकसहभागाच्या रत्नागिरी, ता. २२ : भविष्यात जोरावर तालुक्यात आतापर्यंत ५७७वनराई बंधारे बांधून पूर्ण झाले. यामध्ये लाखो लिटर पाणी साठले आहे. तालुक्यात ६००हून अधिक बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. ही मोहीम अंतिम टप्प्यात असल्याची माहिती रत्नागिरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चेतन शेळके यांनी दिली.
तालुक्यात बंधारे उभारणीत ‘पोमेंडी बुद्रुक’ ग्रामपंचायतीने सर्वाधिक १९ बंधारे बांधून अव्वल स्थान पटकावले. त्या पाठोपाठ तरवळ ग्रामपंचायतीने १५, गोळप १३ तर नाणिज ग्रामपंचायतीने १२ बंधारे बांधून जलसंधारणात मोठे योगदान दिले आहे. समुद्रकिनाऱ्यालगतच्या व खाडीकाठच्या १० ते १२ गावांमध्ये वाहते पाण्याचे स्रोत नसल्याने तेथे बंधारे बांधता आले नाहीत; मात्र, ज्या गावांमध्ये ओढ्या-नाल्यांना अद्याप पाणी आहे तिथे पुढील आठ ते दहा दिवसांत आणखी बंधारे उभारले जाणार आहेत.
टंचाईची झळ होणार कमी
सध्या बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यांमुळे लाखो लिटर पाण्याचा साठा निर्माण झाला असून, भूजलपातळी वाढण्यास मोठी मदत होणार आहे. यामुळे उन्हाळ्यात निर्माण होणाऱ्या पाणीटंचाईची झळ काही प्रमाणात नक्कीच कमी होणार आहे. येत्या १५ दिवसांत उर्वरित बंधाऱ्यांचे काम पूर्ण करण्याचे नियोजन विविध ग्रामपंचायतींनी केले आहे.