जिल्हा तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत एसआरके क्लबची तिसऱ्या क्रमांकावर मोहोर
रत्नागिरी (प्रतिनिधी):
दिनांक १० ते १२ जुलै रोजी देवरुख येथे नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धा २०२६ मध्ये एसआरके क्लबच्या खेळाडूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर वर्चस्व गाजवत स्पर्धेत तिसरा क्रमांक पटकावला आहे. क्लबच्या खेळाडूंनी विविध वजनी गटांत पदकांची लयलूट करत यश संपादन केले.
या स्पर्धेत अमेय सावंत, सामर्थ्य बाने, श्लोक पाटील, वरद माने, गार्गी घडशी, आयुष चव्हाण, अर्जुन पवार, प्रांजल लांजेकर, रोमा तापेकर, श्रेया लिंगायत, स्वरा साखळकर, मृण्मयी वायंगणकर, स्वर्णिका रसाळ आणि आरुष सोनार या खेळाडूंनी सुवर्णपदके जिंकून आपल्या क्लबचा नावलौकिक वाढवला.
एसआरके क्लबच्या खेळाडूंनी सुवर्णपदकांसोबतच अन्य गटांतही चमकदार कामगिरी केली. स्पृहा सावंत, आयुष कोळेकर, तिर्था लिंगायत, आश्वी पाथरे, विधि माने, श्रीयांश हातिस्कर आणि आरवी नार्वेकर यांनी रौप्यपदकाची कमाई केली. तसेच, मृदुला पाटील, अनन्या चव्हाण, हर्ष रसाळ, रोहित कुंडकर, श्रीयांश देसाई, वीरा कडू, शर्ली मलुष्टे, तिर्था लिंगायत, वेदिका पवार आणि विनायक पवार यांनी कांस्यपदके जिंकून संघाच्या यशात मोलाचा वाटा उचलला.
क्लबच्या या अभूतपूर्व यशाबद्दलस्पर्धेत यशस्वी झालेल्या या खेळाडूंच तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे खजिनदार व्यंकटेशराव कररा, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी, अध्यक्ष अमोल सावंत, उपाध्यक्ष वीरेश मयेकर सचिव शीतल खामकर, कोषाध्यक्ष अंजली सावंत, , निखिल सावंत, प्रफुल्ल हतिसकर आणि समस्त पालक वर्ग य प्रशिक्षक आणि पालकांनी खेळाडूंचे अभिनंदन केले