तेलीआळीत दुचाकी घसरून अपघात; दोघे जखमी
रत्नागिरी, : शहरातील तेलीआळी परिसरात दत्तमंदिराजवळ दुचाकी घसरून झालेल्या अपघातात दुचाकीस्वारासह मागे बसलेला तरुण जखमी झाली. शहर पोलीस ठाण्यात दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयुष निलेश पारकर (वय २४, मूळ रा. नेवरे, मुसळवाडी, रत्नागिरी; सध्या रा. खडपेवठार, टेक्निकलसमोर, रत्नागिरी) असे संशयित स्वाराचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (ता. ८) दुपारी दीडच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित आयुष पारकर दुचाकी (क्र. एमएच ०३ बीवाय १४९३) घेऊन सोबत दुचाकीच्या मागील सीटवर रुणाली राजेश शिवलकर (मूळ रा. जाकिमिया, आलावा, तळेकरवाडी, रत्नागिरी; सध्या रा. आदिशक्तीनगर, कारवांचीवाडी, रत्नागिरी) बसल्या होत्या. तेली आळी येथील गिरोबा चौकातील दत्तमंदिरासमोरील पशुराम (बाबा) ढेकणे यांच्या घरासमोरून जात असताना दुचाकीस्वाराचे वाहनावरील नियंत्रण सुटले. रस्त्यावरील परिस्थितीकडे दुर्लक्ष करून निष्काळजीपणे दुचाकी चालवल्याने वाहन घसरून अपघात झाला. या अपघातात आयुष पारकर आणि रुणाली शिवलकर हे दोघेही जखमी झाले. या प्रकरणी सहायक पोलिस उपनिरीक्षक शैलेंद्र पारकर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.