हातखंबा येथे बेदरकारपणे दुचाकी चालकांविरोधात गुन्हा
रत्नागिरी : प्रतिनिधी
मुंबई-गोवा महामार्गावरील हातखंबा येथे दुचाकी बेदरकारपणे चालवणाऱ्या दोन दुचाकी चालकांविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई शनिवार 3 ऑक्टोबर रोजी रात्री 8.25 ते 8.40 वा.कालावधीत करण्यात आली आहे.
गौरव सुभाष पाचकुडे (24,रा.करबुडे मावळती पाचकुडेवाडी,रत्नागिरी) आणि ओंकार अनिल आपकरे (21,रा.पानवल आपकरेवाडी,रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुचाकी चालकांची नावे आहेत. त्यांच्या विरोधात ग्रामीणचे पोलिस कर्मचारी प्रविण पाटील आणि विकास चव्हाण यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, शनिवारी रात्री यातील गौरव पाचकुडे आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एयू-1272) आणि ओंकार आपकरे हा आपल्या ताब्यातील दुचाकी (एमएच-08-एआर-4889) या हातखंबा ते रत्नागिरी जाणाऱ्या रस्त्यावर बेदरकारपणे चालवत असताना ही कारवाई करण्यात आली. त्यांच्या विरोधात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 281 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.