चिपळुणात ३ लाखांचा गुटखा पकडला
चिपळूण
तालुक्यातील खेर्डी येथे ३ लाखांचा गुटखा पकडल्याची घटना बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली. यावेळी गुटख्याची वाहतूक करणारे वाहनही पोलिसांनी जप्त केले आहे. या कारवाईमुळे शहरासह परिसरात छुप्या पद्धतीने गुटख्याची वाहतूक
खेर्डी येथील घटनेने खळबळ, वाहनही जप्त
होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यातील खेर्डी येथे ३ लाखाचा गुटखा बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पकडला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु असल्याने अधिक माहिती उपलब्ध झालेली नाही.