रत्नागिरी सुभाष रोड व हिंदू कॉलनी येथून महिलेसह तरुणाचे अपहरण
रत्नागिरी: शहरातील सुभाष रोड श्रीराम टॉकीज समोरील महिलेचे अपहरण केल्या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना सोमवारी (ता. २८) सप्टेंबरला रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी शिवाजी मारुती मोरस्कर (वय ५०, रा. सुभाष रोड, श्रीराम टॉकीज समोर, रत्नागिरी) यांच्या पत्नी सौ. आरती शिवाजी मोरस्कर (वय ४३) हिला सोमवारी रात्री अज्ञाताने पळवून नेले. या प्रकरणी शिवाजी मोरस्कर यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली.
तसेच शहरातील हिंदू कॉलनी-शिवाजी स्टेडियम येथून अज्ञाताने तरुणाचे अपहरण केले आहे. परर्शुराम रमेश बजंत्री (वय २६, रा. हत्रखाळ ता. विजापूर राज्य कर्नाटक सध्या हिंदू कॉलनी, रत्नागिरी) असे अपहरण झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना रविवारी (ता. २७) रात्री साडेअकराच्या सुमारास हिंदू कॉलनी येथे घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी सुनंदा रमेश बजंत्री (वय ३५, रा. हिंदू कॉलनी, रत्नागिरी) यांचा मुलगा परशुराम बजंत्री याचे अज्ञाताने अपहरण केले. या प्रकरणी सुनंद बजंत्री यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन दोन्ही गुन्ह्यातील अज्ञाताविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास शहर पोलिस अमंलदार करत आहेत.