‘हा माझा शेवटचा मेसेज…’; आईच्या आजारपणाच्या तणावातून २४ वर्षीय तरुणाची आत्महत्या
रत्नागिरी:
आईच्या गंभीर आजारपणामुळे निर्माण झालेल्या मानसिक तणावातून २४ वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केल्याची अत्यंत धक्कादायक घटना धाकटी जांभारी (ता. जि. रत्नागिरी) येथे घडली आहे. रणजित दत्ताराम तांडेल (वय २४) असे मृत तरुणाचे नाव आहे.
रणजितच्या आईचे नुकतेच ब्रेन ट्यूमरचे ऑपरेशन झाले होते व त्या अंथरुणाला खिळून होत्या. या परिस्थितीमुळे रणजित प्रचंड तणावाखाली होता. तो आपल्या चुलत भावाला सोडून येतो असे सांगून घरातून बाहेर पडला आणि त्याने चुलत भाऊ केतन याला व्हॉट्सॲपवर “हा माझा शेवटचा मेसेज आहे” असा संदेश पाठवला. घाबरलेल्या नातेवाईकांनी तातडीने शोध घेतला असता, तो घरापासून १०० मीटर अंतरावर असलेल्या स्मशानभूमीजवळील आंब्याच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. जयगड पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.