बेकायदेशीर खवटीत जमाव, ७ जणांवर गुन्हा
खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील खवटी येथील हॉटेल सुरुचीनजीक बेकायदेशीर जमाव करत दोघांना शिवीगाळ आणि मारहाण करत ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी अमोल दळवी (खवटी-पाथरवाडी) याच्यासह ७जणांवर मंगळवारी रात्री येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अभय गौतम धोत्रे (२३, रा. नातूनगर-वावेफाटा बौद्धवाडी) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. ते. व त्यांचा मित्र योगेश विटले बोरघर येथे चायनीज सेंटरसमोर गाडीवर बसले असतांना संशयितांनी बोलेरो गाडीच्या हेडलाईटसूचा प्रकाश फिर्यादीच्या डोळ्यावर मारल्याने विचारणा केली. याचा राग मनात धरत संशयितांनी फिर्यादीचा पाठलाग करत दोघांना खुर्चीने मारहाण केली. या मारहाणीत दोघांनाही दुखापत झाली आहे.