चिपळूण उड्डाणपूलाचा गणेशोत्सवाचा मुहूर्त हुकला
चिपळूण : १५ वर्षांहून अधिक काळ रेंगाळलेला मुंबई-गोवा महामार्ग काही ठिकाणी अपूर्ण कामामुळे पूर्णपणे वाहतूकीस खुला किंवा अद्याप लोकार्पण झालेला नाही. यासाठी तारीख पे तारीख घोषित केली जाते. चिपळूण शहरातून जाणारा या मार्गावरील सर्वात लांबीचा पूल पूर्ण होण्यास ६ वर्षाहून जास्त काळ लागला. यावर्षी हा पूल गणेशोत्सव मुहूर्तावर सुरू व्हावा यासाठी शेवटची तारीख दिली होती परंतु तारीख पे तारीख मधली ही ही तारीख शेवटची ठरली नाही.
गणेशोत्सव हा महाराष्ट्रात कोकणातील मोठा सण, उत्सव आहे या निमित्तानं कोकणातील गावे,वाडीतील वातावरण भक्तीमय होते ज्यामध्ये सर्व जातीधर्माचे लोक सामील होतात यातून सर्वधर्मसमभाव चा संदेश जातो. मुंबईसह राज्याच्या विविध भागात नोकरी व इतर कारणास्तव राहणारा कोकणी माणूस या सणा निमित्त कोकणात येत असतो, १४ तारखेपासून गणेशोत्सव सुरु होत असल्याने चाकरमानी, गणेशभक्त कोकणात यायला सुरवात झाली आहे माञ त्यांना प्रवासात विविध कारणांनी ञास सहन करावा लागतोय, अशातच वाहतूकीस योग्य पर्याय अशा चिपळूणमधील बहुचर्चित उड्डाणपूल तयार नसल्यामुळे त्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करतानाच, ज्येष्ठ पञकार व सामाजिक चळवळीतील विचारवंत,कार्यकर्ते जाफर गोठे यांनी नुकतीच दिलेली नवीन डिसेंबर-२६ हा महिन्याची तारीख खरंच शेवटची ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग वरील चिपळूणमधील बहुचर्चित उड्डाणपूल बहादूरशेख येथील वाशिष्ठी नदीवरील पूला पासून सुरवात होऊन शहरातील पंचायत समिती येथे संपतो हा उड्डाणपूल मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात जास्त लांबीचा असून त्याची लांबी 1.47 कि.मी. तर रुंदी 25 मीटर आहे. या पूलामुळे चिपळूणच्या वैभवात नक्कीच भर पडणार असून शहरातील वाहतूकीवरील ताण, कोंडी कमी होणार आहे तसेच जलद प्रवास होणार व पर्यटनाला चालाना मिळणार आहे… आनंददायी,भक्तीभावपूर्ण वातावरणातील घरगुती गौरी-गणेण सण सुरु होण्याआदी पूल सुरु व्हावा यासाठी प्रांतआँफीस व पंचायतसमिती येथे भरावाचे काम जोरदार सुरु होते परंतु भरपावसातीला हे काम मजबूत होणार नाही म्हणून काही जागृत नागरिक व सामाजिक कार्यकर्त्यांनी हरकत घेतली, नापसंती व्यक्त केली यांचा विचार करुन काम तूर्तास थांबविण्यात आले असून पाउस संपल्यावर काम सुरु होईल असे म्हटलयं जातेय तसेच लोकार्पण साठी यावर्षातील डिसेंबर महिना निश्चित करण्यात आला आहे. आता केवळ काही काम बाकी असल्यामुळे तशी शक्यता आहे.