हिरकणीच्या मातृप्रेमाची, शौर्याची गाथा घरगुती गणेशोत्सवाच्या देखाव्यातून साकार
सोमेश्वर येथे मयूर भितळे यांच्या ‘हिरकणीची कथा’ देखाव्याचे उद्घाटन
रत्नागिरी: गणेशोत्सवाच्या माध्यमातून कला, संस्कृती, इतिहास आणि समाजप्रबोधनाचा सुंदर संगम साधत सोमेश्वर येथील श्री. मयूर सुरेश भितळे यांच्या निवासस्थानी यंदा ‘हिरकणीची कथा’ हा आकर्षक व आशयपूर्ण गणेशोत्सव सजावट-देखावा साकारण्यात आला आहे.
या देखाव्याचे उद्घाटन जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक निलेश भगवान सांबरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, रत्नागिरी जिल्हाध्यक्ष ॲड. महेंद्र मांडवकर, संस्थेचे सचिव केदार चव्हाण, रत्नागिरी तालुका अध्यक्ष मंदार नैकर, अमर राऊत यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी भितळे कुटुंबीयांच्या वतीने निलेश भगवान सांबरे यांचा सन्मान करण्यात आला. उद्घाटन सोहळ्याला मयूर भितळे यांच्यासह त्यांचे कुटुंबीय, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच सोमेश्वर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.