जयगड ते खंडाळा रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात कारवाई
रत्नागिरी ः प्रतिनिधी
तालुक्यातील जयगड ते खंडाळा जाणाऱ्या रस्त्यावर सार्वजनिक ठिकाणी मद्यप्राशन करणाऱ्या विरोधात जयगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुरुवार 3 सप्टेंबर रोजी रात्री 9.10 वा.सुमारास करण्यात आली.
अमर संतोष कुमार शर्मा (18,मुळ रा.उत्तरप्रदेश सध्या रा.जयगड,रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्या विरोधात पोलिस कर्मचारी रजनिकांत घवाळी यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार, गुरुवारी सायंकाळी संशयित हा आपल्याकडे दारु पिण्याचा कोणताही परवाना नसताना जयगड धान्य गोडावूनच्या पायरीवर सार्वजनिक ठिकाणी दारु पित असताना ही कारवाई करण्यात आली. त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 84 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.