वाहतूकी व रहदारीस अडथळा ; चालकाविरुद्ध गुन्हा
पावस ः रत्नागिरी ते पुर्णगड जाणाऱ्या रस्त्यावर पावस एसटी स्टॅंड समोर चारचाकी लावून वाहतूकीस व रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या संशयिताविरुद्ध पुर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित कुमार जोगलाल शाहू (वय २६, रा. अभ्युदयनगर, रत्नागिरी. मुळ ः सुकडी बैगर बिला, बाळापाट, मध्यप्रदेश) असे संशयित वाहनचालकाचे नाव आहे. ही घटना ३१ ऑगस्टला सकाळी पावणे बाराच्या सुमारास पावस एसटी स्टॉन्ड समोरील रस्त्यावर निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार अमितकुमार शाहू याने वाहन (क्र. एमएच-०८ एक्यू ०८०९) हे वाहतूकीस व रहदारीस अडथळा निर्माण होईल असे रस्त्यावर लावून ठेवले. या प्रकरणी पोलिस हेड कॉन्स्टेबल वैभव कांबळे यांनी पुर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.