गोळपच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी ॲड. संदिप पावसकर
रत्नागिरी – ग्रुप ग्रामपंचायत गोळपची ग्रामसभा नुकतीच ग्रामपंचायत प्रशासक प्रियांका सुर्वे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. सभेत सुरुवातीला मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले.
या ग्रामसभेत शासनाच्या विविध योजना तसेच विकास कामांचा आढावा घेण्यात आला. यावेळी महात्मा गांधी तंटामुक्ती समितीचे पुनर्गठन करण्यात आले. यावेळी तंटामुक्ती अध्यक्षपदी ॲड. संदिप पावसकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना ॲड. पावसकर म्हणाले की, तंटामुक्त समितीतील सर्व सदस्यांना सोबत घेऊन गावातील तंटे सौहार्द पूर्ण वातावरणात आणि सामंजस्याने सोडविण्यासाठी आपण प्रयत्नशील राहू तसेच आपणाला बिनविरोध निवडून दिल्याबद्दल त्यांनी सर्व ग्रामस्थांचे आभार मानले.
यावेळी ग्रामसभा अध्यक्ष तथा प्रशासक प्रियांका सुर्वे यांचे हस्ते नवनिर्वाचित अध्यक्षांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी प्रशासकीय समिती सदस्य संदिप तोडणकर, अविनाश काळे, मंगेश साळवी, वैभव वारीशे,जिगरमियॉं पावसकर, वृषाली पालकर, प्रिया राड्ये, बंधू वारीशे, राजेश पावसकर,महेश भाटकर, बी.के.पालकर, पो.पाटील निलेश भाटकर, नितिशा सुर्वे, राजन उभारे, नितीन खाडे, प्रकाश साळवी, मुरलीधर सुर्वे, उमंग साळवी, अविनाश गुरव, ग्रामपंचायत अधिकारी श्री. भगत, सौ.सीमा सुर्वे, अनिल संते, किशोर पावसकर,बावाशेठ जांगळी, लक्ष्मण गोरे, संदिप राड्ये, अमित भाटकर,संतोष मेस्त्री, मजिद पावसकर तसेच बचत गट प्रतिनिधी आणि महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल पंचायत समिती सदस्य नेताजी पाटील यांनी गोळपला धावती भेट देऊन अभिनंदन केले.