ईद ए मिलाद निमित्त रत्नागिरी शहरात भव्य जुलूस (रॅली) चे आयोजन
रत्नागिरी: ईद ए मिलाद निमित्त रत्नागिरी शहरात मुस्लिम बांधवांची जोरदार तयारी सुरु झाली असुन घरांवर विद्यूत रोषणाई केली आहे.दरम्यान ईद ए मिलाद निमित्त रत्नागिरी शहरात 26 ऑगस्ट रोजी जुलूस (रॅली) निघणार आहे
इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जन्म दिवसा निमित्त ईद ए मिलाद हा सण संपूर्ण भारतात साजरा केला जातो .हा सण इस्लामिक महीन्या प्रमाणे, म्हणजे रबिउल अव्वल च्या तिसऱ्या महीन्यात साजरा केला जातो.हा सण आनंदाने साजरा केला जातो .या दिवशी मुस्लिम बांधव नमाज पठण,तसेच नात व कुरान चे पठण केले जाते.
सदर जुलूस (रॅली) सकाळी 8:30 वाजता कोकण येथुन नगर,मारूति मंदिर,उद्यम नगर चंपक मैदान मार्गे कोकण नगर येथे शेवट होईल या जुलूस (रॅली) मध्ये सर्व मुस्लिम बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन दावते इस्लामी शाखा रत्नागिरी चे अध्यक्ष अल्ताफ कुरेशी यांनी केले आहे,तसेच ईद ए मिलाद निमित्त कोकण नगर परिसरात रविवारी 7वाजता लहान मुलांची रॅली काढण्यात येणार आहे.ईद ए मिलाद चे औचित्य साधुन 26 रोजी दुपारी 2 ते 6 या वेळेत मेमन समाज हॉल येथे मुस्लिम महिलांसाठी इज्तिमा चे आयोजन करण्यात आले आहे