सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या दोघांविरुद्ध गुन्हा
पावस ः तालुक्यातील कोळंबे-ओझरवाडी ते निरुळ ठिकवाडी आणि पावस ते सापूचेतळे जाणाऱ्या रस्त्यावरील निरुळ येथील सार्वजनिक रस्त्यावर मद्यपान करणाऱ्या दोघांविरोधात पूर्णगड सागरी सुरक्षा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक प्रभाकर नागवेकर (५४, रा. कोळंबे ओझरवाडी, रत्नागिरी) आणि विशाल वसंत वारिशे ( वय २४, रा. गोळप धोपटवाडी, रत्नागिरी) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या दोन संशयितांची नावे आहेत. या घटना बुधवारी (ता. ८) रात्री साडेसात ते नऊ या वेळात निदर्शनास आल्या. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना सापडले. या प्रकरणी पोलिस हवालदार सुदेश शिंदे आणि वैभव कांबळे यांनी पुर्णगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी दोन मद्यपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.